Latest

केएल राहुलने शेअर केले अथिया शेट्टीसोबतचे ‘अनसीन फोटो’, जे तुम्ही क्वचितच पाहिले असतील

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: टीम इंडियाचा फलंदाज आणि एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार लोकेश राहुलने नवीन वर्षाचे औचित्य साधत गेल्या वर्षातील सर्वोत्तम क्षणांची आठवण करून देणारा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. २०२१ हे वर्ष त्याच्यासाठी कसे चांगले गेले हे राहुलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अथिया शेट्टीही दिसत आहे. यामध्ये राहुल आणि अथियाचे अनेक न पाहिलेले फोटो आहेत, जे तुम्ही याआधी क्वचितच पाहिले असतील.

केएल राहुल सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येथे त्याला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. यष्टीरक्षक फलंदाज राहुलने यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामनेही जिंकले आहेत. कर्णधार बनल्यानंतर त्याने नवीन वर्ष साजरे केले. यासोबतच राहुलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अथिया शेट्टीसोबत दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल आणि अथियासोबत त्यांच्याशी संबंधित इतर लोकही दिसत आहेत. यामध्ये राहुलच्या जिममधील फोटोंचाही समावेश आहे. हा व्हिडिओ 11 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे आणि त्यापेक्षा अधिक लोकांनी तो पाहिला आहे.


भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. तिथे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. भारताने मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या डावात राहुलने टीम इंडियासाठी शतक झळकावले होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT