Latest

Justin Langer : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांचा राजीनामा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियन क्रिकेट तगडी टीम अशी ओळख आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी आपल्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. जस्टीन लँगर हे गेल्या चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. जस्टीन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या अ‍ॅशेस टेस्ट मालिकेत इंग्लंडला ४-० अशी मात दिली होती. शिवाय जस्टीन लँगर मुख्य प्रशिक्षक असतानाच ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या वर्षीचा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला होता.

जस्टीन लँगर (Justin Langer) यांनी राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांच्याकडे अंतरीम प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अँड्रयू मॅक्डोनाल्ड हे यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. लँगर यांनी हा राजीनाम्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाबरोबर झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे. ही बैठक मेलबर्न मध्ये दिवसभर सुरूच होती. बैठकीनंतर सीईओ निक हॉकने यांनी म्हटले आहे की "मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या बरोबर गोपनीय चर्चा सुरूच आहे. याच्या व्यतिरिक्त बैठकीत कोणताही समाधानकारक निर्णय झाला नाही." पण बैठकीनंतर १८ तासांनी जस्टीन लँगर यांनी राजीनामा दिला.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT