Latest

आयटीआय प्रवेशाची यंदाही क्रेझ

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेसाठी या वर्षी विक्रमी नोंदणी झाली आहे. प्रवेशाच्या नोंदणीसाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. मंगळवारी संध्याकाळपर्यंत 2 लाख 75 हजार 617 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 2 लाख 60 हजार 2 विद्यार्थ्यांनी पैसे भरून नोंदणी पूर्ण केली आहे. प्रवेशासाठी पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, आयटीआय प्रवेशाची क्रेझ यंदाही कायम आहे.

प्रवेशाची पहिली यादी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. 13 जुलै रोजी कच्ची यादी जाहीर केली जाणार आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील 418 शासकीय आयटीआयमध्ये 95 हजार 380 व 574 खासगी आयटीआय 59 हजार 012, अशा 1 लाख 54 हजार 392 जागांवर प्रवेश होणार आहेत. मंगळवारी सहा वाजेपर्यंत 2 लाख 75 हजार 617 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 3 हजार 408 विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरून अर्ज कन्फर्म केले आहेत.

यापैकी 1 लाख 91 हजार 990 विद्यार्थ्यांनी आयटीआय पसंतीक्रम भरला आहे. सर्वाधिक अर्ज हे नाशिक आणि पुणे विभागांतून आले आहेत. अर्ज पूर्ण केलेले 2 लाख 60 हजार 2 विद्यार्थी असल्याने या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येण्यासाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्याची शक्यता संचालनालयाने व्यक्त केली आहे. यंदाही प्रवेशाच्या एकूण चार फेर्‍या तसेच समुपदेशनासाठी एक अशा पाच फेर्‍यांमध्ये या वर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज
करणे : 11 जुलै
प्रवेश अर्ज निश्चित
करणे ः 11 जुलै
संस्था पसंतीक्रम
नोंदविणे ः 12 जुलै
कच्ची गुणवत्ता यादी
प्रसिद्ध ः 13 जुलै
हरकती व बदल करणे ः
13 ते 14 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी
जाहीर ः 16 जुलै
पहिली प्रवेश फेरी :
20 जुलै
पहिल्या यादीनुसार
प्रवेश : 21 ते 25 जुलै

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT