Latest

Covishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार ! DCGI ने दिली परवानगी

अमृता चौगुले

नवी दिल्‍ली, पुढारी ऑनलाईन: काही निर्बंध घालून बाजारामध्ये कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या लसींना DCGI ने विकण्यासाठी गुरूवारी मान्यता दिली आहे. या निर्णयाने कोरोनाची लस लवकरच दुकानांमध्ये उपलब्ध होईल असे नाही. तथापि, रुग्णालये आणि दवाखाने लस विकत घेऊन टोचू शकतील. सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत. केवळ खासगी रुग्णालये आणि दवाखाने लस खरेदी करू शकतील आणि त्या दिल्या जातील.

तसेच, खासगी हॉस्‍पिटलमध्ये आतापर्यंत कोव्हॅक्सिनची किंमत प्रति डोस 1200 रू तर कोव्हीशिल्डची किंमत 780 रू प्रति डोस आहे. या किंमतीमध्ये 150 रू इतके सर्व्हिस चार्ज लावण्यात आला आहे. देशात या दोन्ही लसीचा उपयोग हा आपत्कालीन वापरासाठी करण्यात येत आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण यांचेकडून कोविड 19 वर तज्ज्ञ समितीने 19 जानेवारी रोजी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिनला प्रौढांसाठी काही निर्बंधासह नियमित विक्रीसाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.

नवीन औषधे आणि क्लिनिकल चाचण्या नियम, 2019 अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. कंपनीना क्लीनिकल चाचणी प्रशिक्षणाचा डेटा ही दयावा लागेल. तसेच लस घेतल्‍यानंतर त्‍याच्या होणा-या परिणाम बघणे गरजे राहणार आहे.

आपत्कालीन वापराच्या अधिकृततेमध्ये, सुरक्षिततेचा डेटा DCGI ला 15 दिवसांच्या आत द्यावा लागतो. तसेच 6 6 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीत डेटा रेग्युलेटरकडे सादर करावा लागेल. आणि यासोबत कोविनला सुदधा माहिती द्यावी लागेल. यापूर्वी, यूएसमधील फायझर आणि यूकेमधील एस्ट्राझेनेका यांना सशर्त बाजार मान्यता देण्यात आली आहे.

सीडीएससीओनी काविड19 विषयी विशेषतज्ञ समितीने 19 जानेवारीला सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) सोबत कोविशील्ड आणि भारत बायोटेकने कोवैक्सीन ला काही अटी घालून मान्यता दिली आहे. यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने सुद्‌धा मान्यता दिली.

हे ही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT