पुढारी ऑनलाईन: कोविड-१९ संक्रमणावरील 'पॅक्सलोव्हिड' या अँटीव्हायरल तोंडावाटे घेता येणाऱ्या गोळ्यांना आज गुरुवारी (दि.२६) अमेरिकेत पहिल्यांदाच मान्यता दिली आहे. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने कोविड रूग्णांना देण्यात येणाऱ्या या गोळ्यांचे नाव पॅक्सलोव्हिड (निर्माट्रेलवीर आणि रिटोनावीर गोळ्या) असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या प्रौढांना गंभीर कोविड संक्रमण आहे किंवा सौम्य ते मध्यम स्वरूपाचा कोविडचा धोका आहे, अशा व्यक्तींना देखील या अँटीव्हायरल गोळ्या (Covid pill Paxlovid) तोंडावाटे घेण्यास येथील प्रशासनाने परवानगी दिली आहे.
पॅक्सलोव्हिड या कोविडवरील अँटीव्हायरल गोळ्यांची निर्मिती अमेरिकेतील प्रमुख फार्मा कंपनी फायझरने केली आहे. या कंपनीचे कोविडवरील हे चौथे औषध, तर पॅक्सलोव्हिड (Covid pill Paxlovid) ही कोविडवरील पहिली तोंडी अँटीव्हायरल गोळी असल्याचे 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात म्हटले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाने 2021 च्या उत्तरार्धात आणीबाणीच्या वापरास परवानगी दिल्यापासून पॅक्सलोव्हिडसाठी 11 दशलक्षाहून अधिक प्रिस्क्रिप्शन (Covid Pill Paxlovid) वितरित केल्या आहेत, असे देखील फायझर कंपनीने स्पष्ट केले आहे.
पॅक्सलोव्हिड या कोविडवरील गोळ्या प्रौढांसाठी देण्यास पूर्ण मान्यता (Covid pill Paxlovid) दिली आहे. वयस्कर, प्रौढ व्यक्ती, मधुमेह, दमा आणि लठ्ठपणा यासारख्या सामान्य वैद्यकीय स्थितीमध्ये देखील कोविड रूग्णांना ही अँटीव्हायरल गोळी देता येऊ शकते, असे देखील यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने स्पष्ट केले आहे.