Latest

Covid 19 | देशात कोरोनाचा धोका कायम, २४ तासांत ७,८३० नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या ४० हजारांवर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ७,८३० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ४०,२१५ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की नवीन XBB1.16 व्हेरिएंट हा लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून स्वतःचा बचाव करतो आणि यामुळे पुढील चार आठवडे महत्त्वाचे आहेत. (Covid 19)

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने धास्ती वाढली आहे. याआधीच्या दिवशी कोरोनाचे ५,६७६ रुग्ण आढ‍ळून आले होते. तर याआधी देशात कोरोनाचे ५,८८० रुग्णांची नोंद झाली होती. देशात रविवारी संपलेल्या मागील आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत ७९ टक्के वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात ३६ हजार रुग्णांची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील रुग्णसंख्या ही सात महिन्यांतील सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रात ९१९ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे ९१९ नवे रुग्ण आढळून आले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. यात मुंबईतील २४२, नागपुरातील १०५, पुणे ५८, नवी मुंबईतील ५७ रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. राज्यातील एकमेव कोविड-१९ मृत्यूची नोंद अकोला शहरात झाली आहे. याआधीच्या दिवशी राज्यात ३२८ रुग्ण आढळून आले होते. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. गेल्या रविवारी ७८८ रुग्णांची नोंद झाली होती. (Covid19)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT