Latest

Corona Update : पुन्हा कोरोना वाढतोय का? WHO म्‍हणते, “मागील एक महिन्‍यात…”

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : थंडीच्‍या आगमनाबराेबर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले की,गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोना रुग्णसंख्येत ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात जगभरात कोरोनाचे एकूण ८,५०,००० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  (Corona Update)

कोरोना मृतांच्या संख्येत ८ टक्क्यांनी घट

कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा जगाला घाबरवून सोडले आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, जगभरात कोरोनाचे एकूण ८,५०,०००  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गेल्या महिन्यात जगभरात 3000 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, मृतांच्या संख्येत ८ टक्क्यांनी घटही झाली आहे.

Corona Update : कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, १७ डिसेंबरपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७ कोटींहून अधिक झाली आहे, तर आतापर्यंत ७० लाख लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचे १,१८,००० नवीन रुग्ण आढळले आहेत.  त्यापैकी १६०० हून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. कोरोनाचा नवीन प्रकार JN.1 ( जेएन.१) च्या रुग्णांची संख्या जरी झपाट्याने वाढत असले तरी हा JN.1 हा फारसा धोकादायक नाही. पण थंडी जसजशी वाढत जाईल तसतशी विविध देशांमध्ये श्वसनाच्या आजारांचा धोकाही वाढेल, असा इशाराही जागतिक आराेग्‍य संघटनेने दिला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT