Latest

Collegium : कॉलेजियमवर वादग्रस्त विधान, उपराष्ट्रपती, कायदामंत्र्यांविरुद्ध हायकोर्टात याचिका

backup backup

मुंबई : पुढारी वृत्तसेवा कॉलेजियम Collegium, न्यायपालिका व सर्वोच्च न्यायालयाविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अहमद अब्दी यांनी या दोघांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Collegium कॉलेजियम, न्यायपालिका व सर्वोच्च न्यायालयाच्या न पटणाऱ्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करताना राज्यघटनेअंतर्गत उपलब्ध असलेले अन्य मार्ग विचारात घेतले नाहीत. त्याऐवजी अत्यंत अपमानास्पद भाषेचा वापर करून न्यायपालिकेवर जाहीर टीका करण्यात आली. याप्रकरणी उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजू यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अब्दी यांनी जनहित याचिकेत केली आहे.

उपराष्ट्रपती व कायदामंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे जनमानसात सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी झाली आहे. उपराष्ट्रपती व कायदामंत्री हे दोघे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम Collegium व्यवस्थेवर तसेच मूलभूत संरचनेच्या सिद्धांतावर टीका करून खुलेआम हल्ला करत आहेत, असा आरोप करताना धनखड आणि रिजिजू यांनी संविधानावर अविश्वास दाखवून स्वतः ला कोणत्याही संवैधानिक पदावर राहण्यासाठी अपात्र ठरविले आहे, असा दावा केला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT