Latest

वाळकीच्या तरुणांचे उत्तराखंडमध्ये योगदान

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर तालुक्यातील वाळकी येथील तरुणांनी उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याने तब्बल नऊ तास बंद असलेला रस्ता मोकळा करण्यात मोलाचे योगदान दिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक मनोज भालसिंग व त्यांचे सहकार्‍यांचा त्यात समावेश होता. भालसिंग व त्यांचे मित्र उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेला गेले आहेत. या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली व यामध्ये अनेक भाविक जखमी झाले.

रस्ता पूर्णपणे बंद पडला. रात्री उशिरा शासकीय मदत मिळत नसल्याने मनोज भालसिंग व त्यांच्या सहकार्‍यांनी तेथील लोकांना मदतीला घेऊन मध्यरात्री रस्त्यावरील मोठे दगड बाजूला सरकविण्यास सुरवात केली. त्यांच्या प्रयत्नांतून तब्बल नऊ तासानंतर रस्ता मोकळा झाला. त्यानंतर शासकीय मदत उपलब्ध होऊन स्थानिक पोलिस प्रशासन व अधिकार्‍यांनी भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोठे, गणेश बोठे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT