Latest

Lok Sabha Election 2024 : ‘मोदी-मोदी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना थप्पड मारा’ काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते शिवराज तंगडगी (Shivraj Tangadgi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 'मोदी-मोदी म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना थप्पड मारा' असे विधान तंगडगी यांनी केले आहे. कोप्पल येथील निवडणूक (Lok Sabha Election 2024) रॅलीदरम्यान त्यांनी हे भाष्य केले.

शिवराज एस तंगडगी म्हणाले की, "भाजप आता निवडणूक प्रचार (Lok Sabha Election 2024) करत आहे मात्र त्यांना लाज वाटली पाहिजे. आता ते कोणत्या तोंडाने मते मागत आहेत? भाजपने दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. आतापर्यंत कितीजणांना नोकरी दिली? तरुणांनी रोजगार मागितला तर ते पकोडे विकायला सांगतात. तरीही विद्यार्थ्यांनी मोदी-मोदीचा जप केला तर अशा विद्यार्थ्यांना थप्पड मारल्या पाहिजेत," असे ते म्हणाले.

भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार तंगडगी यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर तरुण मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. अशा वक्तव्यामुळे तरुणांमध्ये भीती निर्माण होऊ शकते आणि ते मतदानापासून दूर राहू शकतात, असे भाजपने तक्रारीत म्हटले आहे. तंगडगी यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून (Lok Sabha Election 2024) आणि काँग्रेसचा प्रचार करण्यापासून रोखण्यात यावे, असे भाजपने म्हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT