Latest

Navjot Singh Sidhu surrenders : नवज्योतसिंग सिद्धू पटियाला कोर्टात शरण!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. आता त्यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागणार असल्याची चर्चा आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर सिद्धू वैद्यकीय तपासणीसाठी पटियाला येथील माता कौशल्या रुग्णालयात गेले. (Navjot Singh Sidhu surrenders)

३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना काल सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सिद्धू यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिलासा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. (Navjot Singh Sidhu surrenders)

नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती सिद्धू यांचे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी दिली. (Navjot Singh Sidhu surrenders)

अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या खंडपीठासमोर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला. सिंघवी यांनी सिद्धूच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत आत्मसमर्पण करण्यासाठी काही काळ विनंती केली. त्यावर न्यायमूर्ती खानविलकर म्हणाले की, हे प्रकरण विशेष खंडपीठाशी संबंधित आहे. याप्रकरणी सरन्यायाधीशांकडे अर्ज दाखल करून सुनावणीची मागणी केली.

SCROLL FOR NEXT