Latest

Congress President Election : काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीवर शशी थरुर यांचा आक्षेप

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस अध्यक्ष (Congress President Election) पदाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. आज (दि. १९) या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून या धर्तीवर अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी या निवडणुकीवरच आक्षेप नोंदवला आहे. खासदार थरूर यांनी काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून, यूपीमधील घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये अत्यंत गंभीर अनियमितता असल्याचा आरोप केला आहे तसेच यूपीमधील सर्व मते अवैध मानली जावीत अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सोमवारी (दि.१७) झालेल्या निवडणुकीत या निवडणुकीमध्ये ९, ९१५ पात्र काँग्रेस नेत्यांपैकी सुमारे ९६ टक्के मतदान झाले होते. गांधी घराण्याचे दीर्घकाळ निष्ठावंत राहिलेले मल्लिकार्जुन खर्गे हे या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. आणि ते अध्यक्ष झाले तर गांधी परिवाराकडून ;रिमोट कंट्रोल' केला जाईल असे थरूर यांच्या बाजूकडील नेत्यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर थरूर यांचे निवडणूक प्रतिनिधी सलमान सोझ म्हणाले, "आम्ही मधुसूदन मिस्त्री यांच्या कार्यालयाशी सतत संवाद साधत असून त्यांना अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल माहिती दिली आहे, तरीही त्यांच्याकडून काहीही तपशीलात येऊ शकत नाही."

काँग्रेस अध्यक्षपदाची ही निवडून २० वर्षात पहिल्यांदा होत असून यामध्ये प्रत्यक्षरित्या गांधी परिवारातील कोणीच उभे राहिलेले नाही. तरीही, खासदार थरूर यांचे प्रतिस्पर्धी व काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी परिवाराचे सर्वात जवळचे असल्याने त्यांना आधीच त्यांची मान्यता असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT