Latest

PM Modi on Congress : काँग्रेसने मराठवाड्याचा विश्‍वासघात केला: PM मोदींचा धाराशिवमध्ये हल्‍लाबोल

अविनाश सुतार

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तब्बल 60 वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने मराठवाड्याचा भूमीचा केवळ विश्‍वासघातच केला. या काळात ते शेतीला पाणी देऊ शकले नाहीत. काँग्रेसला सिंचन योजनांवर 60 वर्षांत जितके काम जमले नाही, तितके काम आम्ही केवळ 10 वर्षांत करु शकलो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्‍लाबोल केला. PM Modi on Congress

महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (दि. 30) पंतप्रधान मोदी यांची तेरणा इंजिनिअरींग कॉलेजवळील मैदानावर सभा झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्‍ल पटेल, पालकमंत्री तानाजी सावंत, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. ज्ञानराज चौगुले, आ. राजाभाऊ राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. PM Modi on Congress

पंतप्रधान मोदी यांनी या वेळी इंडिया आघाडी तसेच काँग्रेसवर जोरदार हल्‍ला केला. ते म्हणाले, की देशातील नागरिकांचे जीवन बदलण्यासाठी मी अहोरात्र काम करीत आहे; तर इंडिया आघाडीचे लोक मात्र मला बदलण्यासाठी झटत आहेत. त्यांचे सगळे घोटाळे उघड करीत असल्याने तसेच त्यांचे भ्रष्टाचाराचे दरवाजे बंद केल्याने ते अस्वस्थ आहेत.

'एआय'च्या माध्यमातून माझे खोटे व्हीडीओ तयार करुन चुकीचा प्रचार करण्यापर्यंत वैचारिक दारिद्य्र काँग्रेसकडे आल्याची टिका त्यांनी केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशात सत्ता स्थापन करण्यासाठी 272 जागा जिंकणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात काँग्रेसला तितक्या जागा लढवायलाही ताकद राहिलेली नाही. तरीही ते देशात सत्ता स्थापन करण्याची भाषा करतात हा मोठा विनोद आहे. त्यांची ही 'झूठ की दुकान' जनतेने बंद करावी. जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना पाटील यांना मोठ्या फरकाने विजयी करावे, आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. सभेला नागरिकांनी मोठी  होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पर्यायी मार्गाने हि वःतून वळविण्यात आली होती.

PM Modi on Congress पंतप्रधान मोदी म्हणाले…

तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी राज्य सरकारची ठोस पावले, केंद्रानेही मदत केली आहे.
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल.
धाराशिव हे मोठे रेल्वे जंक्शन होईल.
येथून पूर्वी 1 रेल्वेगाडी धावत होती आता 24 धावत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT