हेमंत गोडसे नंतर धाराशिवच्या जागेसाठी तानाजी सावंत यांच्या समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

File Photo
File Photo

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : नाशिकचे आमदार हेमंत गोडसे यांच्यानंतर धाराशिवच्या जागेसाठी तानाजी सावंत यांचे समर्थक आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केले.धाराशिवची जागा ही परंपरागत शिवसेनेची असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.मात्र बराच वेळ वाट बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंत समर्थकांना भेटलेच नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला.

धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना धाराशिव लोकसभेतुन उमेदवारी मिळावी या मागणीसाठी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन केले.तानाजी सावंत समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर यावेळी दाखल झाले होते.धाराशिव लोकसभेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतुन अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या तानाजी सावंत आणि कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धडक दिली.शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याने वाहतुककोंडी देखील झाली होती.

धाराशिवची जागा शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने ती शिवसेनेला मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असून मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचे म्हणणे मांडण्यासाठी आम्ही आलो होतो असे धनंजय सावंत यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच तिकीट नाकरल्याने नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानीच शक्तिप्रदर्शन केले होते.मात्र गोडसे यांना नाशिकची जागा आपल्या पदरात पाडून घेता आली नाही.बराच वेळ वाट बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटलेच नाही त्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news