Latest

काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २४४ उमेदवार जाहीर

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने आज (दि.७) लोकसभेसाठी पश्चिम बंगाल राज्यातील आणखी तीन उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये बानगाव मतदार संघातून प्रदीप विश्वास, उलबेरिया मतदार संघातून अजहर मौलिक, घटाळ मतदार संघातून डॉ. पापिया चक्रवर्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २४४ उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १३ जागांचा समावेश आहे.

काँग्रेस हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी देऊ शकते. विक्रमादित्य हे राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आहेत. त्यांची आई प्रतिभा सिंह या मंडीच्या विद्यमान खासदार आणि हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षाही आहेत. प्रतिभा सिंह यांनी यापूर्वीच निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT