जोगेश्वरी: पुढारी वृत्तसेवा : '72 हूरें' (72 Hoorain) हा चित्रपट सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या शुक्रवारी (दि. ७) हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. आता चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोरेगाव स्टेशनमध्ये एका व्यक्तीने तक्रार दाखल केली की, या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप केला आहे.
सय्यद अरिफली महम्मदली नावाच्या व्यक्तीने गोरेगाव पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 72 हूरेंचे (72 Hoorain) दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंग चौहान यांनी केले आहे. तर अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
या व्यक्तीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, '72 हूरें' चित्रपटात इस्लाम धर्माचा अपमान करण्यात आला आहे. हा चित्रपट जातीय भेदभाव आणि द्वेषाला प्रोत्साहन देतो. या चित्रपटामुळे लोकांमध्ये मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन होईल, असे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा