पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यूडफोटोमुळे चर्चेत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोमुळे सोशल मीडीयावर त्याच्यावर टीकाही करण्यात येत आहे. तर काही जणांनी रणवीरचे कौतुकही केले आहे. दरम्यान, न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Complaint agaist ranveer)
न्यूडफोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप गुन्हा दाखल करतेवेळी करण्यात आला आहे. रणवीरने पेपर या मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. हे फोटो अनेकांना आवडले आहेत तर दुसरीकडे अनेकांनी रणवीरला ट्रोलही केले आहे. "रणवीरचे अशा प्रकारचे फोटो अगदीच नवीन नाहीत. रणवीरने विविध प्रकारच्या फॅशनचे प्रयोग यापूर्वी केलेले आहेत. त्याच्या फॅशनवर टोकाच्या प्रतिक्रिया यापूर्वीही आलेल्या आहेत. पण रणवीरला हा प्रोजेक्ट करायचा होता. याबद्दल त्याची भूमिका स्पष्ट होती." मे-जूनमध्येच हे फोटो तयार होते, पण रणवीरला थोडी वाट पाहावी, असे वाटत होते. (Complaint agaist ranveer)
रणवीरचे न्यूडफोटो दीपिकाला आवडले होते. सोशल मीडियावर हे फोटो शेअर होण्यापूर्वीच दीपिकाला दाखवण्यात आले होते. दीपिका नेहमीच रणवीरला साथ देते. रणवीरला जेव्हा वेगळे काही करायचे असते तेव्हा ती त्याच्या पाठीशी असते. (Complaint agaist ranveer)