Latest

PV Sindhu vs  Michelle Li : बॅटमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधूची सुवर्ण पदकाला गवसणी, दुखापतग्रस्‍त असतानाही झुंझार खेळीचे प्रदर्शन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने राष्‍ट्रकुल क्रीडा स्‍पर्धेत एकेरीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.  तिने कॅनडाच्‍या मिशेल ली हिला २१- १५, २१ -१३ असे  पराभूत केले. ( PV Sindhu vs  Michelle Li )  तिच्‍या या कामगिरीमुळे या स्‍पर्धेत भारताच्‍या खात्‍यावर १९ व्‍या सुवर्ण पदकाची नोंद झाली आहे. विशेष म्‍हणजे, हाताला दुखापत झाली असतानाही सिंधुने उत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आणि कोट्यवधी भारतीयांचे मान गर्वाने उंचावली. सिंधूने प्रथमच राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

या स्‍पर्धेतील उपांत्‍य फेरीत मलेशियाच्‍या जिया याव मिनवर सलग दोन सेट्‍समध्‍ये विजय मिळवत  पी. व्ही. सिंधूने फायनलमध्‍ये धडक मारली होती. फायनलमध्‍ये कॅनडाच्‍या मिशेल लीशीबरोबर झाली. मिशेलने २०१४च्‍या राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. पहिल्‍या सेटच्‍या सुरुवातीला दोन्‍ही खेळाडूंनी सावध सुरुवात केली. ( PV Sindhu vs  Michelle Li )

दुखापतीने त्रस्‍त असतानाही उत्‍कृष्‍ट खेळाचे प्रदर्शन

सिंधुने अंतिम सामन्‍यात असणारा सर्व दबाव झुगारत आत्‍मविश्‍वासने सर्वोत्‍कृष्‍ट खेळीचे प्रदर्शन केले. मिशेलनेही बचावात्‍मक खेळीने गुण मिळवत चाहत्‍यांची मने जिंकली. दोघींनी आपले गुण कायम ठेवत सात-सात अशी गुणांची बरोबरी साधली. यानंतर दुखापतीने त्रस्‍त असतानाही सिंधुने आपला नैसर्गिक आक्रमक खेळ कायम ठेवत सलग आठ गुणांची निर्णायक आघाडी घेतली. मात्र यानंतर मिशेलने दुखापतीमुळे सिंधुला आलेल्‍या मर्यादा हेरत सलग काही गुण पटकावत कमबॅकचा प्रयत्‍न केला. मात्र यानंतर सिंधुने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत पहिला गेम २१- १५ असा जिकंला.

दुसर्‍या गेममध्‍ये तब्‍बल ५७ फटक्‍यांची सर्वोत्‍कृष्‍ट रॅली

दुसर्‍या गेममध्‍ये मिशेलने काही आक्रमक फटके मारताना चुका केल्‍या याचा पुरेपूर फायदा घेत सिंधुने सामन्‍यावरील आपली पकड कायम ठेवली. सलग सहा  गुण घेत  दुसर्‍या गेममध्‍येही निर्णायक आघाडी घेतली.  मात्र  मिशेलने दाेन सलग गुण घेतले. यानंतर मिशेलच्‍या १० गुणांसाठी जबरदस्‍ती रॅली झाली. तब्‍बल ५७ फटक्‍यांची ही रॅली या सामन्‍यातील सर्वोत्‍कृष्‍ट रॅली ठरली.  यानंतर सिंधूने पुन्‍हा एकदा आपल्‍या नावाला साजेसा खेळ करत हा सेट २१-१३  असा जिंकत सुवर्ण पदकावर आपलं नाव काेरलं.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT