जळगाव : पुढारी वृत्तसेवा- दहावीच्या पेपरला आजपासून सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यात दहावीच्या पेपरला 50 हजार 581 विद्यार्थी बसलेले आहेत. आज पहिल्या दिवशी मराठीचा पेपर होता, दरम्यान यावलच्या सेंड झाकीर हुसेन माध्यमिक विद्यालयात एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी मराठीचा पेपर होता. जिल्ह्यातून 50 हजार 581 विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरलेला आहे. यापैकी 49 हजार 704 विद्यार्थी मराठीच्या पेपरला उपस्थित होते. 877 विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी दांडी मारली.
दहावी परीक्षा बोर्डाने विद्यार्थ्यांनी कॉपी करु नये म्हणून आवाहन केले होते. त्यासाठी अनेक उपाययोजना करुन निर्णय घेतले होते. मात्र, तसे असतानाही मराठी या पहिल्याच भाषेच्या पेपरला कॉफीचा प्रकार जळगाव जिल्ह्यात उघड झाला आहे. यावल येथील जाकीर हुसेन माध्यमिक विद्यालयात मराठीच्याच पेपरला कॉपी करताना विद्यार्थ्यास पकडण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे.
हेही वाचा :