Latest

पाण्याची तहान शहाळ्यांवर`; दर कमी झाल्याने झाल्याने मागणी वाढली

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

जून महिना सुरू झाला असूनदेखील उकाडा कमी होत नाही. त्यामुळे शहाळ्यांना मागणी कायम आहे. नारळाचे पाणी (शहाळे) स्वस्त झाले असून, ग्राहक शहाळे पिण्यासाठी कामातून थोडा 'ब्रेक' घेत आहेत.

शहरात दररोज हजारो शहाळ्याची विक्री केली जात आहे. रस्त्याच्या कडेला शहाळ्याचे ढिग दिसून येत आहेत. 20 रुपयाला एक 100 रुपयाला सहा, अशी विक्री सुरू असल्याने नागरिक शहाळ्यांना पसंती देत आहे. एप्रिल महिन्यात 40 रुपये मिळणारे शहाळे मे महिन्यात 50 रुपयाला मिळत होते. काळेवाडी परिसरात या शहाळ्याची घाऊक पद्धतीने विक्री केली जाते. एका ट्रकमध्ये किमान आठ ते दहा हजार नारळ असतात. शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला नारळ पाण्याची (शहाळ्याची) विक्री चालू आहे. तसेच फळांच्या हातगाड्यांवरही अंतर्गत भागात फिरून नारळ पाण्याची विक्री केली जाते.

शहरात कोकण, केरळमधून मोठ्या प्रमाणात शहाळे येतात. सध्या शहाळे 20-25 रुपयाला मिळत आहे. पावसाळ्यात शहाळ्याची मागणी कमी होईल.

– जयराम मरे, नारळ विक्रेते

SCROLL FOR NEXT