Latest

Nanded News : नांदेड रेल्वे स्थानकावर बोगीला आग; जीवितहानी टळली

अविनाश सुतार

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड रेल्वे स्थानकावरील पीट लाईनवर देखभाल व दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका बोगीला अचानक आग लागली. काही क्षणातच ही बोगी पूर्णतः जळून खाक झाली. आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वे कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यांना यश आले नाही. सुदैवाची बाब म्हणजे ही बोगी पॅसेंजर ट्रेनला जोडली नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. ही घटना आज (दि.२६) सकाळी ९ च्या दरम्यान घडली. Nanded News

नांदेड रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मंगळवारी सकाळी पीट लाईनवर रेल्वे उभी होती. या रेल्वेत एक जनरल बोगी होती. या बोगीच्या अर्ध्या भागात प्रवासी आसनव्यवस्था आहे. आणि अर्ध्या भागात पार्सल ठेवले जातात. ही बोगी पूर्णा-परळी या रेल्वेला जोडण्यात येणार होती. ही रेल्वे सायंकाळी ४.३० वाजता पूर्णामार्गे परळीकडे निघणार होती. Nanded News

मात्र त्यापूर्वीच या रेल्वेच्या एका बोगीला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. धूर आणि आग निदर्शनास येताच कर्मचार्‍यांनी गाड्या धुण्याच्या पाईपने जळत्या बोगीवर पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत ती पूर्णपणे जळाली होती.

हा डब्बा रेल्वेपासून बाजूला करण्यात आला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली यासंदर्भात अधिकृत माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली नाही. मात्र, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, एवढेच सांगण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT