Latest

Closing Bell | शेअर बाजारात अस्थिरता, JFS ला फटका, पण स्पेस स्टॉक्स १० टक्क्यांपर्यंत वाढले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) आज (दि.२४) तेजीत सुरुवात केली होती. पण दोन्ही निर्देशांक घसरून बंद झाले. सेन्सेक्स १८० अंकांनी घसरून ६५,२५२ वर बंद झाला. तर निफ्टी ५७ अंकांच्या घसरणीसह १९,३८६ वर स्थिरावला. गेली तीन दिवस बाजारात तेजी राहिली होती. पण या तेजीला आज ब्रेक लागला. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय पातळीवर ऑटो, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस, फार्मा, मेटल प्रत्येकी ०.३ ते ०.८ टक्क्यांनी घसरले. तर आयटी निर्देशांक वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. दरम्यान, भारतीय रुपया ११ पैशांनी वाढून ८२.५७ प्रति डॉलरवर बंद झाला.

सेन्सेक्स आज ६५,७२२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,९१३ अंकांपर्यंत वाढला. तर बंद होताना तो ६५,३०० च्या खाली आला. रिलायन्स, पॉवर ग्रिड, एलटी, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक हे शेअर्स घसरले. तर इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, अल्ट्राटेक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, बीपीसीएल, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले. तर पॉवर ग्रिड, ओएनजीसी, रिलायन्स, ग्रासीम हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

जिओ फायनान्शियलला ३१ हजार कोटींचा फटका

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ची उपकंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JFSL) ला सलग चौथ्या दिवशी फटका बसला. बाजारात हा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतरच्या चार दिवसात कंपनीचे बाजार भांडवल ३१ हजार कोटींनी कमी झाले आहे. आज गुरुवारी जेएफएसएलचा शेअर बीएसईवर चौथ्या दिवशी ५ टक्के लोअर सर्किटवर २१५.९० रुपयांपर्यंत खाला आला. (Stock Market Closing Bell)

स्पेस स्टॉक्सची रॉकेट भरारी

चांद्रयान- ३ मोहिमेच्या यशामुळे (Chandrayaan-3 Lands On Moon) स्पेस स्टॉक्स तेजीत आले आहेत. अंतराळ क्षेत्रासाठी उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले आहे. काल बुधवारी या क्षेत्रातील काही शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत वाढले. यामुळे त्यांच्या बाजार भांडवलात १३ हजार कोटींची वाढ झाली. तर ISRO च्या चांद्रयान-३ मोहिमेत ज्या कंपन्यांची भूमिका राहिली त्यांचे शेअर्स गुरुवारी १० टक्क्यांपर्यंत वाढले. ३ लाख ८४ हजार किमीचे अंतर कापून चंद्रापर्यंत पोहोचलेल्या 'चांद्रयान-३'ने बुधवारी इतिहास रचला. चंद्रावर तिरंगा फडकला. चांद्रयानाच्या 'विक्रम' लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय टेकवले आणि अवघा देश आनंदाने बेभान झाला. याचा पॉझिटिव्ह ट्रेंड शेअर बाजारातही दिसून आला.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीसचे शेअर आज ७ टक्के वाढून ७६८ रुपयांवर गेला. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा (MTAR Technologies Share Price) शेअर आज सुमारे ५ टक्के वाढून २,३२२ रुपयांवर पोहोचला. सेंटम इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर (Centum Electronics Share Price) सुमारे ९ टक्क्यांहून अधिक वाढून १,७९८ रुपयांवर गेला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT