Latest

पेन ड्राईव्ह तपास सीआयडी करणार, सरकारी वकीलांचा राजीनामा ; गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १२५ तासांचे रेकॉर्डिंग असलेला व्हिडिओ बॉम्ब विधानसभेत सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती. यातून त्यांनी भाजप नेत्यांना अडकवण्याचे कारस्थान होत असल्याचे म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या आरोपांना आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत उत्तर दिले. त्यांनी सव्वाशे तासांच्या स्टींग ऑपरेशनचे सीआयडीकडून चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

 व्हिडिओनंतर चर्चेत आलेल्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी या प्रकणात कोणाचीही पाठराखण नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र पोलीसांवर विश्वास नाही का ? अशी विचारणा त्यांनी केली. ज्या पोलीसांचा अभिमान आहे म्हणता, तर त्यांच्यावर विश्वास नाही का, सीबीआयकडे प्रकरण पाठवण्याचा आग्रह बरोबर नाही. मी कोणाचाही पाठराखण करणार नाही, प्रकरण तपासावं लागेल असे गृहमंत्री म्हणाले.

ज्या पोलीसांचा अभिमान त्यांच्यावर विश्वास नाही का ?

दरम्यान, फडणवीस यांनी आजही आणखी एक स्टींग ऑपरेशनचा पेन ड्राईव्ह सादर करून खळबळ उडवून दिली. याचाही संदर्भ देत गृहमंत्री वळसे पाटलांनी फडणवीस यांना आपण राज ठाकरेंनाही पेन ड्राईव्ह दिला होता, परवा दिला, आजही दिला, काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीय का ? अशी कोपरखळी मारली.

आणखी एक पेन ड्राईव्ह फडणवीसांकडून सादर

सव्वाशे तासांच्या स्टींग ऑपरेशननंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज आणखी एक पेन ड्राईव्ह सादर केला. या पेन ड्राईव्हमध्ये डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असल्याचा आरोप केला. डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यामधील संभाषण पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे फडणवीस म्हणाले. सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT