Latest

Chittah Welcome to India : …असे आले चित्ते! नामिबियातून भारतापर्यंतचा प्रवास…(पाहा व्हिडिओ)

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chittah Welcome to India वन्यजीव प्रेमींची प्रतीक्षा संपली. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने महत्वाकांक्षी योजना हाती घेऊन नामिबियातून चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला. आज अखेर या बहुप्रतिक्षीत चित्त्यांची प्रतीक्षा संपली. आज सकाळी विमानाने नामिबियातील 8 चित्ते दाखल झाले आहेत. विमानाने हे चित्ते भारतात दाखल झाले आहेत. हे विमान ग्वाल्हेरमध्ये पोहोचले. तेथून हे चित्ते हेलिकॉल्प्टरने मध्यप्रदेशातील कुनो या राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहे.

Chittah Welcome to India : सुशांता नंदा या IFS अधिका-यांनी त्यांना नामिबियातून भारतात कसे आणले गेले याचा संपूर्ण प्रवास व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केले आहे. चित्त्यांसाठी हा प्रवास सोपा नव्हता. तब्बल 16 तासांचा प्रवास करून हे चित्ते भारतात आले आहेत. 16 तासांचा विमान प्रवास नंतर पुन्हा कुनो उद्यानापर्यंत हेलिकॉप्टरमधून प्रवास. हा निश्चितच खूप अवघड प्रवास या चित्त्यांसाठी होता. पाहा चित्त्यांचा या प्रवासाचा व्हिडिओ

भारतात या चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मध्य प्रदेशातील कुनो येथे आगमन झाले आहे. लवकरच त्यांना कुनो उद्यानात सोडण्यात येईल.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT