Latest

Chitra Wagh :’५० टक्के…महिला okk’ म्हणत चित्रा वाघ यांनी केला अर्ध्या तिकीट दरात एसटी बसचा प्रवास

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व महिलांना एस टी बस प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलत शुक्रवारपासून (दि.18) लागू करण्यात आली. ही योजना लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि.१८) या योजनेचा लाभ भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतला. या प्रवासादरम्यान त्यांनी '५० टक्के…..महिला okk' च्या घोषणा देत अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला.

राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीची घोषणा केली होती.  ही सवलत कालपासून (दि.१७) लागू करण्यात आली आहे. फडणवीस यांनी गुरुवारी (दि.9) अर्थसंकल्प मांडला होता. राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाले. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. (Chitra Wagh)

Chitra Wagh : लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिंदे-फडणवीस सरकारने महिलांसाठी केलेल्या एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीचा लाभ घेतला. त्यांनी ठक्कर एसटी डेपो ते मालेगाव दरम्यानचा प्रवास केला. या संदर्भात त्यांनी 'लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…' असं ट्विट करत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,"लालपरीची सवारी, महिला घेई भरारी…फक्त बोलणारे नाही, तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. श्रींच्या पादूका पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या या पवित्र लालपरीच्या प्रवासात माऊलींना 50% सवलत देण्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये सन्माननीय अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केली आणि लागलीच त्याची पूर्तता देखील झाली.

आज सकाळी नाशिकच्या ठक्कर बाजार येथून स्वतः सहकाऱ्यांसह ST ने प्रवास सुरू केला. तिकिटावरती सवलतीची रक्कम पाहून खात्रीच पटली. प्रवासात इतर स्त्रियांशी चर्चा केली. त्यांना होणारा फायदा सांगताना चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने सुकर करणाऱ्या या 'लालपरी सशक्त नारी' योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मातृशक्ती तर्फे मनःपूर्वक आभार.

Chitra Wagh :काय आहेत अटी आणि सूचना

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत लागू करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

  • सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [साधी, मिडी/मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी बसेसमध्ये ५० % सवलत दि.१७/०३/२०२३ पासून देण्यात येत आहे.
  • ही सवलत ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागू राहील.
  • ही योजना 'महिला सन्मान योजना 'या नावाने संबोधण्यात येत आहे.
  • ही सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत लागू आहे.
  • ही सवलत शहरांतर्गत बस सेवा वाहतुकीस लागू नाही.
  • ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अशा महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.
  • ही लागू केलेल्या दिनांक पूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात यावा.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ. स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तू व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.
  • मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मूल्याची
  • परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या तिकीटांचे वसूली मूल्य ५० % राहिल. प्रवास केलेल्या महिलांची एकूण संख्या समजावी याकरिता प्रत्येक महिलेस हे मूळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)
  • सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत द्यावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय- ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मूल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/- रु.३०/-, रु.४०/- रु. ५०/- व रु.१००/- मूल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. सवलत इटीआय मशीनमध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.
  • लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणा-या विनामूल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.) ७५ वर्षावरील महिलांसाठी 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेच्या परिपत्रकीय सूचनेनुसार १००% सवलत लागू असेल. ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना 'महिला सन्मान योजना' हीच सवलत लागू असेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT