Latest

Indo-China Clash : चीनचे तीन ड्रोनही पिटाळले! जवानांनी डझनोगणती चिन्यांची हाडे मोडली

backup backup

इटानगर (अरुणाचल प्रदेश) : Indo-China Clash : वृत्तसंस्था अरुणाचलमधील तवांगमध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिकांतील हिंसक धुमश्चक्रीनंतर भारतीय हवाई दलाने अरुणाचलच्या सीमेवर लढाऊ विमानांनी गस्त सुरू केली आहे. भारतीय हद्दीत घुसलेल्या ६०० वर चिनी सैनिकांचा यशस्वी मुकाबला करून भारतीय जवानांनी त्यांना पिटाळून लावण्यापूर्वी चीनने अरुणाचलच्या हद्दीत तीन ड्रोन घुसविण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. भारतीय हवाई दलाने हे तिन्ही ड्रोन पिटाळून लावले होते.

Indo-China Clash : तवांगच्या यांगत्से एलएसीजवळील (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) होलीदीपमधील भारतीय चौक्यांना तसेच या भागातील भारतीय जवानांच्या गस्तीला चीनचा विरोध आहे. भारतीय चौकी हटविण्यासाठीच चिनी सैनिकांच्या अनेक तुकड्यांनी ९ डिसेंबरचा हल्ला केला होता. भारतीय जवानांनी तो यशस्वीरीत्या परतवून लावला. एवढेच नव्हे तर चिनी सैनिकांना पळता भुई थोडी केली. चिनी सैनिकांकडे लोखंडी काटेरी दांडे व इलेक्ट्रिक बॅटन होते. गलवानकडून धडा घेतलेला असल्याने भारतीय जवान यावेळी सज्ज होते. हीच शस्त्रे भारतीय जवानांकडेही होती. कितीतरी चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी जायबंदी केले. अनेकांची हाडे मोडली. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Indo-China Clash : गेल्या काही आठवड्यांत तीनवेळा चीनने भारतीय चौक्यांच्या दिशेने ड्रोन रवाना केले होते. प्रत्येक वेळेला भारतीय लढाऊ विमानांनी हे ड्रोन पिटाळून लावले. सुखोई ३० एमकेएल या लढाऊ विमानाने चीनचे हे हवाई अतिक्रमण रोखण्याची कामगिरी पार पाडली, अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिली आहे. एलएसीच्या पलीकडे किंवा प्रत्यक्ष एलएसीवर चिनी ड्रोनच्या उड्डाणांवर भारतीय हवाई दलाला कुठलाही आक्षेप नाही; पण चिनी विमान किंवा चिनी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे भारतीय रडारवर दिसल्यास अशा हवाई अतिक्रमणाविरोधात आम्ही तत्क्षणी कारवाई करू, असे भारतीय हवाई दलाचे म्हणणे आहे.

Indo-China Clash : ड्रॅगनचा डोळा तवांगवर का?

१) १७ हजार फूट उंचावरील तवांगवर ताबा मिळवल्यास संपूर्ण अरुणाचलवर नजर ठेवता येईल.

२) १९६२ च्या युद्धात चीनने तवांगवर ताबा मिळविला खरा; पण युद्धबंदीनंतर चीनला माघार घ्यावी लागली होती. तवांग मॅकमोहन रेषेच्या म्हणजेच येथील एलएसीच्या आत, भारतीय हद्दीत आहे.

३) एलएसी ओलांडण्यासाठी नेपाळ व तिबेट सीमेवरील चंबा तसेच तवांग या चीनच्या दृष्टीने दोन मोक्यांच्या जागा आहेत.

४) तिबेटवरील चीनच्या ताब्याविरोधात लढणारे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा १९५९ मध्ये तिबेटबाहेर पडले तेव्हा तवांगमध्ये काही दिवस राहिले होते. तवांगला एक मोठा बौद्ध विहार आहे. दलाई लामा हे तेव्हापासून चीनविरोधात जागतिक जनमत तयार करण्याचे काम करत आहेत. यातूनच तवांग हा चीनने प्रतिष्ठेचा मुद्दा केलेला आहे.

५) भारत-चीन सीमेलगत चीनने बांधलेला हायवे तवांगजवळून जातो.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT