Latest

salami slicing : चीनची ‘सलामी स्लाइसिंग’ अर्थात इंच-इंच जमीन बळकावण्याची रणनीती; पूर्व लडाखमधील 26 पेट्रोलिंग पॉइंट्सवरील तैनाती भारताने गमावली

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय सैन्याने प्रतिबंधात्मक किंवा गस्त न घातल्यामुळे पूर्व लडाखमधील सीमेजवळील पूर्व लडाखमधील 65 पेट्रोलिंग पॉइंटस् पैकी 26 पॉइंट्सवरील तैनाती भारताने गमावली आहे. लेह-लडाखच्या पोलीस अधीक्षक वरिष्ठ आयपीएस अधिकारी पीडी नित्या यांनी याबाबतचा अहवाल तयार केला आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीतील पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या वार्षिक अखिल भारतीय परिषदेत हा अहवाल सादर करण्यात आला. उपस्थिती गमावल्याने चीनला याचा फायदा मिळत आहे. या क्षेत्रावर दावा करण्यासाठी भारतीय बाजूच्या पीपीने चिन्हांकित केलेल्या कुंपण नसलेल्या भागावर वर्चस्व राखण्यासाठी चीन आक्रमकपणे सैन्य तयार करत आहे. (salami slicing)

या अहवालात म्हटले आहे की, काराकोरम खिंडीपासून चुमुरपर्यंत 65 पेट्रोलिंग पॉइंट्स आहेत. ज्यावर ISF द्वारे नियमितपणे गस्त घातली जाते. मात्र या 65 पैकी 26 पेट्रोलिंग पॉइंट्स असे आहेत जिथे प्रतिबंधात्मक किंवा गस्त न केल्यामुळे या भागातून भारताची तैनाती नष्ट झाली आहे. त्यामुळे चीनला या भागावर हक्क सांगण्याची आयतीच संधी मिळते. या भागात ISF फार पूर्वीपासून उपस्थित नव्हते मात्र चिनी लोक उपस्थित होते. यामुळे ISF च्या नियंत्रणाखालील सीमा भारतीय बाजूकडे वळते आणि अशा सर्व कप्प्यांमध्ये "बफर झोन" तयार केला जातो ज्यामुळे शेवटी भारताचे या भागावरील नियंत्रण गमावले जाते. (salami slicing)

salami slicing : चीनची 'सलामी स्लाइसिंग' इंच-इंच जमीन बळकावण्याची रणनीती

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ची जमीन इंच-इंच बळकावण्याची ही रणनीती "सलामी स्लाइसिंग" म्हणून ओळखली जाते," असे अहवालात म्हटले आहे. "पीएलएने डी-एस्केलेशन चर्चेतील बफर क्षेत्रांचा फायदा सर्वोच्च शिखरांवर त्यांचे सर्वोत्तम कॅमेरे लावून आणि आमच्या सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून घेतले आहे. ही विचित्र परिस्थिती चुशुलमधील ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉप पर्वत, डेमचोक, काकजंग, हॉट स्प्रिंग्समधील गोगरा टेकड्यांवर आणि चिप चाप नदीजवळील डेपसांग मैदानावर दिसून येते," अहवालात म्हटले आहे.

"'सलमी स्लाइसिंग' धोरणासह चीन बफर झोनमध्येही आमच्या हालचालीवर आक्षेप घेतो. हे 'त्यांचे' कार्यक्षेत्र असल्याचा चीनकडून दावा केला जातो आणि नंतर आम्हाला आणखी 'बफर' क्षेत्रे तयार करण्यासाठी पाठीमागे जाण्यास सांगितले जाते. ही परिस्थिती गलवान येथील वाई नाल्यासोबत घडली आहे. जिथे आम्हाला वाय नाल्याच्या देखरेखी खाली उच्च पदांवर वर्चस्व न ठेवता कॅम्प-1 मध्ये परत जावे लागले; चुशूल येथे एअरफील्डजवळील बीपीएम झोपडी डी-फॅक्टो एलएसी बनली आहे आणि डेमचोक येथील निलुंग नाला प्रतिबंधित करण्यात आला आहे," असे या अहवालातून समोर आले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT