Latest

India-China border clash : चीनने घेतले नमते; सीमावादावर घेतली ‘ही’ भूमिका; चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे सीमावर्ती भागात भारतीय आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यानंतर भारत आणि चीनमधील सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला होता. या प्रश्नावर चीनकडून नमती भूमिका घेण्यात आली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दोन देशातील संबंधांबाबत निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी भारत-चीन सीमावर्ती भागात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चीन भारतासोबत काम करण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे.

चीन-भारत संबंध सुधारण्यासाठी आणि ते वाढवण्याच्या दिशेने चीनने पाऊल उचलले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी याविषयी माहिती देताना म्हटले आहे की, भारत-चीन सीमाभागाच्या प्रश्नावर भारतासोबत काम करण्यास आम्ही तयार आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी त्यांच्यामधील संवाद हा राजनैतिक आणि लष्कराच्या माध्यमांद्वारे कायम ठेवला आहे. हे दोन्ही देश हे सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता राखण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. अशी माहिती एएनआयने दिली आहे.

भारत-चीन मध्ये २० डिसेंबरला १७ वी कमांडर स्तरीय चर्चा आयोजित करण्यात आली होती. दरम्यानच्या चर्चेत पश्चिमेकडील भागात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी दोन्ही देशांकडून सहमती दर्शवण्यात आली आहे. एमईएने केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लष्करी आणि डिप्लॉमेटिक माध्यमांद्वारे संपर्कात राहण्यास, संवाद कायम ठेवण्यास, परस्पर सांमजस्याने भूमिका घेत लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याची तयारी दोन्ही देशांनी दर्शवली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT