Latest

Chief of Defence Staff : स्टार्टअप्स आणि भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान म्हणाले,

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chief of Defence staff : स्टार्टअप्ससाठी भारत हा जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम आहे. तसेच 2024 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी आशा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केली. दिल्ली येथील एका कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, सरकारद्वारे मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या आज 84 हजारहून अधिक आहेत. त्यामुळे भारत जागतिक स्तरावर स्टार्टअपसाठी तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम म्हणून उदयास येत आहे. तसेच 2024 पर्यंत आम्ही जर्मनीला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची आशा करतो, असे CDS म्हणाले. (Chief of Defence)

 Chief of Defence staff : संरक्षण उत्पादन हे नवीन सूर्योदय क्षेत्र

जनरल चौहान यांनी यावेळी सरकारच्या औद्योगिक धोरणांविषयी बोलताना म्हणाले, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत सरकारने औद्योगिक परवाना मिळण्याची प्रणाली सुलभ केली आहे, एफडीआय मर्यादा वाढवली आहे, संशोधन आणि विकास आणि एमएसएमईसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. यासोबतच संरक्षण उत्पादनात खाजगी कंपन्यांना आवश्यक क्षेत्र प्रदान केले आहे.

आज आमचे संरक्षण उद्योग संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच निर्यातीसाठी विविध प्रकारच्या लष्करी हार्डवेअरची निर्मिती करत आहेत. यामुळे देशांतर्गत गरजांचा वाटा वाढला आहे, जो 2018 मध्ये वरच्या ट्रेंडवर होता. माझा विश्वास आहे की संरक्षण उत्पादन हे नवीन सूर्योदय क्षेत्र आहे जे भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढीचे साक्षीदार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT