Latest

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली छत्रपती संभाजीराजेंची भेट

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ( दि. २२ ) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (CM Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून, त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक मुख्यमंत्र्याना भेट दिली. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आमदार कॅप्टन अभिजीत अड सूळ उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी दिल्ली दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त निराधार आहे, अशी स्पष्टोक्ती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली. मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षण आणि शिवसेना राज्यप्रमुखांच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर होते. बुधवारी रात्री त्यांनी मराठा आरक्षणासंबंधी बैठक घेतल्याचे देखील केसरकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT