डोंबिवली : फुल विक्रेत्यांचा कल्याण ‘एपीएएमसी’मधील शेड पाडला | पुढारी

डोंबिवली : फुल विक्रेत्यांचा कल्याण 'एपीएएमसी'मधील शेड पाडला

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण कृषी समिती बाजापेठे येथील न्यायालयाच्या आदेशानुसार फुल मार्केटची शेड आज मोठ्या बंदोबस्तात पाडण्यात आली. मात्र यावेळी अनेक फुल विक्रेत्यांनी ही शेड पाडण्यासाठी विरोध केला. विशेष म्हणजे ही शेड केडीएमसीच्या ताब्‍यात असताना त्या जागेवर एपीएमसी तर्फे कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

कल्याण कृषी समिती बाजारपेठेत फुलांचा व्यापार चालतो. या फुल बाजारात जुन्नर, नगर, हैद्राबाद, नाशिक या भागातून शेतकरी फुल विक्रीसाठी पाठवतात. मात्र सध्या ज्या ठिकाणी हे फुल विक्रेते बसतात ती जागा केडीएमसीच्या ताब्यात होती. त्या जागेचा पुनर्विकास व्हावा यासाठी एपीएमसीचे प्रयत्न सुरू होते. विक्रेत्यांचा या विकासाला विरोध असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.अखेर या प्रकरणी न्यायालयाने शेड पाडण्याचे आदेश एपीएमसीला दिले होते. सात दिवसात ही कारवाई करा असे आदेशित केले होते.

15 सप्टेंबर रोजी हे आदेश प्राप्त झाल्यावर एपीएमसी प्रशासनाकडून त्याठिकाणी विक्रेत्यांना नोटिसा बजावून आज कारवाई केली जाईल असे सूचित केले होते. आज कारवाईकरीता पथक पोहचले असता त्याला फूल विक्रेत्यांनी विरोध केला. काही महिला फूल विक्रेत्यांनी जेसीबीसमोर उभे राहून विरोध केला. हा विरोध पाहता बाजार समिती प्रशासन कारवाई विषयी ठाम असल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

बाजार समितीचे सभापती कपील थळे यांनी सांगितले की, “न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे.
शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले की, एपीएमसीने केलेल्या कारवाईचा निषेध आहे. ही चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे. ज्या जागेवर फूल विक्रेत्यांचे शेड होते. ती जागा केडीएमसीला दिली आहे. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यात धोकादायक शेड पाडण्याचे म्हटले आहे. मात्र क प्रभाग अधिकार्‍यांनी 2020 साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटनुसार शेड धोकादायक नसताना सत्ता आणि पैसाचा जोरावरही कारवाई केली.”

हेही वाचा 

 

Back to top button