पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहचण्यास आज अखेर मंगळवारी (दि.२८) १७ व्या दिवशी बचावपथकाला यश आले. आज सायंकाळी ४१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढले आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनंतर या बचावकार्याबाबत माहिती मिळाली. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या यशस्वी बचावकार्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यशस्वी बचावकार्यातील सर्व टीमचे सर्वांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी सर्वांचे आभार मानले. (Uttarkashi Tunnel Rescue)
धामी बचावकार्याबाबत माहिती देताना म्हणाले की, जे सर्वात लहान असतील त्यांना बाहेर काढले जाईल आणि त्यानंतर हळूहळू सर्वांना बाहेर काढण्यात येईल अशी योजना आखली होती. त्याप्रमाणे बचावकार्याने मोहीम राबवली. दरम्यान धामी बाबा बौखनाग यांचे देखील या बचावकार्यानंतर आभार मानले.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणतात, "या बचाव कार्यात सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे मी आभार मानू इच्छितो…पीएम मोदी सतत माझ्या संपर्कात होते आणि बचाव कार्याचे अपडेट घेत होते. त्यांनी दिले. कसेही करून सर्वांना सुखरूप बाहेर काढणे माझे कर्तव्य आहे.. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. त्यांनी आत्ताच माझ्याशी बोलून प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी झालीच पाहिजे असे निर्देश दिले. त्यांना त्यांच्या घरी…" (Uttarkashi Tunnel Rescue)
हेही वाचा