Latest

छत्तीसगड : एक लाख रूपये बक्षीस असलेल्या नक्षलवादी जोडप्याचे आत्मसमर्पण

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमामध्ये एक लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवादी जोडप्याने सुरक्षा दलांना आत्मसमर्पण केले. मुचकी गले आणि मुचकी भीमा असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी दाम्पत्याचे नाव आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी टोंगपाल तोमेश वर्मा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

दुसरीकडे, छत्तीसगडच्या पुनर्वसन आणि आत्मसमर्पण धोरणामुळे प्रभावित झालेल्या नक्षलवाद्यांच्या गंगालूर एरिया कमिटीच्या तीन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. शुक्रवारी विजापूरमध्ये एसपी अंजनेय वार्ष्णेय आणि इतर उच्च पोलिस अधिकाऱ्यांसमोर, गंगलूर एरिया कमिटीचे जन मिलिशिया कमांडर सन्नू पुनेम उर्फ ​​रमेश, वडील मासा पुनेम (वय ३५), तोतापारा बुर्जी पोलिस स्टेशन गांगलूर, आरपीसी बुर्जी डीएकेएमएस सदस्य सोनू पुनेम, वडील मासा पुनेम (वय ४४) तोता पारा पोलीस स्टेशन गांगलूर आणि आरपीसी पुस्नार संघमचे सदस्य आयुतु पुनम आणि वडील पांडू पुणेम (वय ४९) रा. पुसनर पोलीस स्टेशन गांगलूर यांनी आत्मसमर्पण केले.

माओवाद्यांच्या विचारसरणीला कंटाळून आणि छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन आणि आत्मसमर्पण धोरणामुळे प्रभावित होऊन त्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना पुनर्वसन आणि आत्मसमर्पण धोरणांतर्गत प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख प्रोत्साहन देण्यात आले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सन्नू पुनम हा २००५ ते २०१९ पर्यंत अनेक घटनांमध्ये सामील होता. सोनू पुनम हा २००९ ते २०१० या काळात घडलेल्या घटनांमध्ये सहभागी होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT