Latest

RSSच्या ‘घरवापसी’चे यश : छत्तीसगडमध्ये २०० ख्रिस्ती आदिवासी हिंदू धर्मात परतले | Ghar Wapsi in Chhattisgarh

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २०० आदिवासींनी छत्तीसगडमध्ये पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. हे आदिवासी पहाडी कोरवा समुदायातील आहेत. धर्मजयगड येथील कुमार्ता पंचायतीतील बारघाट गावात वैदिक मंत्रपठणात या ५६ कुटुंबांनी पुन्ही सनातन धर्म स्वीकारला. (Ghar Wapsi in Chhattisgarh)

हा कार्यक्रम भाजपचे ज्येष्ठ नेते प्रबल प्रताव जुदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. जुदेव येथील राजघरण्याचे वंशज आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या आदिवासी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 'घरवापसी' अभियान राबवले जाते. "आदिवासी भागात बेकायदेशीर धर्मांतर केले जाते, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत," असे जुदेव म्हणाले. ही बातमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या वेबसाईटने दिले आहे.

हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश करत असलेल्या आदिवासींचे पाय गंगाजल धुण्यात आले. वैदिक मंत्राच्या उच्चारात घरवापसी कार्यक्रम झाला. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  (Ghar Wapsi in Chhattisgarh)

घरवापसी अभियान | Ghar Wapsi in Chhattisgarh

छत्तीसगडमध्ये घरवापसी अभियानाला माजी केंद्रीय मंत्री दिलिप सिंग जुदेव यांनी गती दिली. छत्तीसगडमध्ये जानेवारी महिन्यात २५१ कुटुंबातील १ हजार आदिवासींनी हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला. तसेच सरगुजा जिल्ह्यात झालेल्या घरवापसी कार्यक्रमात १४० ख्रिस्ती आदिवासींनी हिंदू धर्मात प्रवेश केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT