Latest

Chhatrapati Shivaji Maharaj | शिवरायांची वाघनखे तीन वर्षांसाठीच भारताकडे, ब्रिटनने घातली अट

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वधासाठी वापरलेली वाघनखे भारतात परत आणली जाणार आहेत. त्यासाठी ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ३ ऑक्टोबर रोजी सामंजस्य करारावर सह्या करण्यात येणार आहेत. तीन वर्षांसाठी ही वाघनखे भारताकडे सोपविण्यास ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाने मान्यता दिली आहे.

 संबंधित बातम्या 

शिवरायांची वाघनखे आणि जगदंब तलवार आदी वस्तू भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विभाग प्रयत्नशील होता. यातील वाघनखे भारताला सुपुर्द करण्याची तयारी ब्रिटनने दाखविली आहे. त्यानुसार सामंजस्य करारासाठी मंत्री मुनगंटीवार यांच्यासह विभागाचे पथक १ ऑक्टोबरला ब्रिटन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तर, ३ ऑक्टोबरला ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे प्रतिनिधी आणि मंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करारावर सह्या करण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारानंतर नोव्हेंबर महिन्यात ही वाघनखे भारतात दाखल होतील. तीन वर्षांसाठी ही वाघनखे भारताकडे सोपविण्यास ब्रिटनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाने मान्यता दिली आहे. मात्र, ही वाघनखे कायमस्वरुपी द्यावीत, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, ही वाघनखे इकडे आणताना काही अटींचे पालन करावे लागणार आहे. वाघनखे गावोगावी फिरवता येणार नसल्याचीही एक अट आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ही वाघनखे ठेवली जाणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांना या संग्रहालयात शिवरायांची वाघनखे पाहता येतील. (Chhatrapati Shivaji Maharaj)

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT