Latest

छत्रपती संभाजीनगर : बुलढाणा अर्बनच्या गोदामाला भीषण आग, २५ कोटींचे नुकसान, अग्‍निशमन दलाचे प्रयत्‍न सुरू

निलेश पोतदार

छत्रपती संभाजीनगर ; पुढारी वृत्‍तसेवा सिल्लोड मार्गावरील भारत दर्शन मागील बाजूला असलेल्या बुलढाणा अर्बनच्या गोदामाला सोमवारी रात्री १२ : ३० वाण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात असलेले २३ कोटी रुपयांची कापुस गटाणी जळून खाक झाली. आगीचा प्रकोप इतका मोठा होता की, टीनही वितळले. ही आग अजुनही धुमसत आहे. आग नियंत्रणासाठी बुलढाणा, जामेर, संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले होते. या ठिकाणी वैजापूर, श्रीरामपूर, राहुरी, शिर्डी येथील व्यापाऱ्यांची कापूस गठानी ठेवलेली होती.

१३०० स्‍क्‍वेबर फुटांच्या चार गोदामांत हे साहित्य ठेवण्यात आले होते. या वेअर हाऊसला रात्री अचानक आग लागली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेची फायर यंत्रणा तात्काळ पोहोचली. मात्र, यावेळी आगीने रौद्ररूप धारण केले होते. यानंतरही आग एका ठिकाणावरून दुसऱ्या गोदामाकडे सरकत गेली.

यानंतर आगीचा चांगलाच भडका उडाला. या ठिकाणची वेअर हाऊस (गोदामावर) असलेले टीन आगीत वितळून गेले. आग वाढत असल्याने बाजूच्या गोदामातील साहित्य इतरत्र हलविण्यासाठी मोठी धावपळ या ठिकाणी पाहायला मिळाली. दरम्यान ही आग कशामुळे लागली होती याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT