Latest

Chetan Sharma : चेतन शर्मा यांचा BCCI च्या चिफ सिलेक्टर पदाचा राजीनामा

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा (BCCI chief selector Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय संघ आणि बीसीसीआयबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली, विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराटला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती.  (Chetan Sharma)

तसेच जसप्रीत बुमराहची दुखापत, हार्दिक पंड्याचे करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेली वक्तव्ये ऐकून भारतीय क्रिकेटसिकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो मान्य केला आहे.

'या' आरोपांनंतर माजली खळबळ

  • भारतीय खेळाडू 80 ते 85 टक्के फिट झाल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी इंजेक्शन घेतात
  • भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचे सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करण्यावरून संघ व्यवस्थापनाशी मतभेद होते. बुमराहला अजूनही संघात संधी मिळालेली नाही.
  • भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. यातील मुख्य मुद्दा होता तो दोघांत ठासून भरलेल्या अहंकाराचा.

खिशाला लागणार कात्री

शर्मा यांना बीसीसीआयकडून वर्षाला तब्बल 1.25 कोटी रुपये इतका पगार दिला जातो. जगातल्या कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या निवडकर्त्याला इतका पगार मिळत नाही. आयडल नेटवर्थच्या रिपोर्टनुसार शर्मा यांची नेट वर्थ 5 मिलियन डॉलर्स (41 कोटी रुपये) इतकी आहे.

हेही वाचा; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT