Spy Balloon : स्पाय बलून प्रकरणावर बायडेन यांची प्रतिक्रिया चीनला म्हणाले…

Spy Balloon : स्पाय बलून प्रकरणावर बायडेन यांची प्रतिक्रिया चीनला म्हणाले…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : चीनी Spy Balloon गुप्तचर फुग्यासहित अन्य संदिग्ध वस्तुंना कारवाई करून खाली पाडल्याबद्दल जो बायडन यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बायडेन म्हणाले, चीन सोबत आम्हाला नवीन शीत युद्ध नको आहे. आम्ही चीन सोबत या विषयी संवात आणि मुक्त संचार व्यवस्थेची अपेक्षा करतो. तसेच ते स्वतः शी जिनपिंग यांच्यासह याविषयी संवाद साधण्याची आशा बाळगतात. मात्र, असे असले तरी स्पाय बलून सह अन्य संदिग्ध वस्तू पाडल्याबद्दल मला कोणतीही खंत नसून आपण दिलगिरी व्यक्त करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चीनचा एक फुगा Spy Balloon आठवडाभर अमेरिकेच्या सागरी किना-यावर फिरत होता. चीनने हेरगिरी करण्यासाठी हा फुगा पाठवल्याचे म्हटले जात होते. मात्र, चीनने त्याचा नकार केला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लष्कराला तो फुगा पाडण्याचे आदेश दिले. 4 फेब्रुवारीला शूट करून हा फुगा खाली पाडण्यात आला. याचा चीनने निषेध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार हा फुगा हवामानाशी संबंधित होता. तो चुकून अमेरिकेत पोहोचला. तो अमेरिकेने पाडायला नको होता, असे म्हणत चीनने याचा निषेध केला होता. या घटनेनंतर आणखी काही दिवसांनी अमेरिका-कॅनडा सीमेवर तसेच अलास्का येथे आकाशात तीन संदिग्ध वस्तू दिसून आल्या. अमेरिकन लष्कराने कारवाई करून या वस्तू देखील पाडल्या आहेत. त्यामुळे चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा तीव्र निषेध केला. त्यानंतर जो बायडेन यांनी यावर गुरुवारी प्रतिक्रिया दिली आहे.

Spy Balloon त्या तीन अज्ञात वस्तू चीनच्या हेरगिरी फुग्याशी निगडीत असल्याचे अद्याप संकेत नाही

यूएस अध्यक्ष म्हणाले की गुप्तचर समुदायाचे सध्याचे मूल्यांकन असे आहे की, पाडलेल्या 'त्या' तीन वस्तू फुग्यासारख्या होत्या. बहुधा खाजगी कंपन्या, मनोरंजन किंवा संशोधन संस्था, हवामान संशोधन संस्था किंवा इतर वैज्ञानिक संशोधन संस्थांकडून संबंधित होत्या. मात्र, गुप्तचर समुदायाला, खाली पाडलेल्या त्या तीन वस्तू चिनी पाळत ठेवणारे, हेरगिरी करणारे फुगे होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news