Latest

Chardham Yatra 2023 : उद्धव ठाकरे सहकुटुंब बद्रीनाथाच्या दर्शनाला!

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (दि.३) बद्रीनाथ धामवर सहकुटुंब पोहोचले. त्यांनी बद्री विशालचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. आज सकाळी १० वाजता ते बद्रीनाथ धामला पोहोचले. यावेळी मंदिर समितीने त्यांचे स्वागत करून प्रसाद दिला. यानंतर ते केदारनाथ धामलाही जाणार आहेत. (Chardham Yatra 2023)

उद्धव ठाकरे यांनी पूजेनंतर  भाविकांशी संवाद साधून यात्रेची माहिती घेतली. या दरम्यान त्यांनी भाविकांसोबत छायाचित्रेही काढली. यानंतर ते बद्रीनाथला पोहोचले. येथे बीकेटीसीचे उपाध्यक्ष किशोर पनवार यांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांना देवाचा नैवेद्य व अंगावरचे वस्त्र अर्पण करण्यात आले. यावेळी धर्मगुरू राधाकृष्ण थापलियाल, मंदिराचे अधिकारी राजेंद्र चौहान आणि मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौर आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT