Latest

‘मी मूनवॉकसाठी जाऊ शकतो का…’, जेव्हा प्रज्ञानने विक्रमला चंद्रावर चालण्याची परवानगी मागितली, वाचा चॅट

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : चांद्रयाण-३ विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीवर उतरल्‍यानंतर अनेक फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. इस्रो कडून ट्वीट करून या विषयी वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे. बुधवार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयाण-३ च्या लँडरने चंद्राच्या जमिनीवर सॉफ्ट लँडिग केले. लँडिगच्या २ तास २६ मिनिटानंतर लँडरमधून प्रज्ञान रोव्हरही बाहेर आले. विक्रम लँडरने आपल्‍या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रज्ञान रोव्हरचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते पृथ्‍वीवर इस्रोला पाठवले.

इस्रोने काल (शनिवार) रात्री रोव्हरचा एक व्हिडिओ शेअर करत लँडिगनंतर लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्यामध्ये कशाप्रकारे बोलणे झाले ते प्रसिद्ध केले आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, कशाप्रकारे रोवर (प्रज्ञान) विक्रम लँडरच्या आतमध्ये बसून चंद्रापर्यंत पोहोचले होते. त्‍याने लँडिगनंतर अशा प्रकारे विक्रमशी परवानगी मागितली की, जणू एखादे मुल घरातून बाहेर जाण्यासाठी कुटुंबातील एका वरिष्‍ठांशी (आई, वडिल, इतर) परवानगी मागते.

चंद्राच्या जमिनीवर उतरण्याआधी प्रज्ञान रोव्हरने विक्रमला विचारले, 'मी मूनवॉकसाठी जाऊ शकतो का?' यावर विक्रमने एका ज्‍येष्‍ठाप्रमाणे परवानगी देताना सांगितले की, होय तू जाउ शकतोस मात्र माझ्‍या संपर्कात रहा. ज्‍यावर प्रज्ञान रोव्हर म्‍हणतोय, 'Yaaaaahoooo… (याहूहूहू……)' यानंतर तो विक्रम मधून उतरून चंद्राच्या जमिनीवर येतो.

लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत जवळपास १० लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर जवळपास ४५ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर ६ हजारहून अधिक लोकांनी तो रिपोस्‍ट केला आहे. लोकांकडून इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतूक करण्यात येत आहे.

हा व्हिडिओ त्‍या वेळेचा आहे, जेंव्हा प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर पडून चंद्राच्या जमिनीवर उतरले होते. चांद्रयाण-३ च्या यशानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा ध्वज फडकवण्यात आला आहे. व्हिडिओ मध्ये प्रज्ञान रोव्हरचे फोटो समोर आले आहेत, ज्‍यावर इस्रोचा लोगो आणि भारताचा तिरंगा दिसून येत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT