Latest

Chandrayaan-3 mission: पुढील १४ दिवस चांद्रयान-३ काेणता अभ्‍यास करणार…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेने (इस्रो) बुधवारी (दि.२३) इतिहास घडविला. चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. चंद्राच्‍या दक्षिण ध्रुवावर प्रथम चांद्रयान उतरवणारा देश, अशी भारताची ओळख झाली आहे. आता चांद्रयान-३ पुढील  १४ दिवस मुक्काम करून चंद्रावर अभ्यास करणार आहे. (Chandrayaan-3 mission )

Chandrayaan-3 mission : भारताने इतिहास घडविला

बुधवारी सायंकाळी 6.4 मिनिटांनी भारताने एक इतिहास घडविला. चांद्रयान-३ हे १४ दिवस मुक्काम करून चंद्रावर अभ्यास करेल (जे चंद्राच्या एका दिवसाच्या बरोबरीचे आहे). चांद्रयान-2 च्या अपयशानंतर चार वर्षांनी २०१९ मध्ये चांद्रयान-३ चे प्रक्षेपण करण्यात आले. मागील मोहिमेतील अपयश लक्षात घेऊन त्यात विशेष बदल करण्यात आले आणि बुधवारी (दि.२३) इस्रोने पूर्ण आत्मविश्वासाने आपल यशस्वी लँडिंग केले. पहिल्यांदाच एखादा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरला आहे.

चांद्रयान-3 किती दिवस काम करेल?

विक्रम लँडर पुढील १४ दिवस चंद्रावर काम करणार आहे.  या काळात ते चंद्रावरील पाणी, खनिज याची माहिती घेणार आहे. तसेच चंद्रावर हाेणारे भूकंप, उष्णता आणि मातीचाही अभ्यास करणार आहे. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील २९ दिवसांच्या बरोबरीचा असतो. या दरम्यान दिवसाची वेळ १४ दिवस आणि रात्र १४ दिवस असते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT