पुढारी ऑनलाईन : चांद्रयान-३ हे चंद्राच्या दृष्टीक्षेपात आले असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिले आहे. यासंदर्भातील ट्विट इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटरवरून केले आहे.
चांद्रयान-३ हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चांद्रयान-3 ची कक्षा आजच्या फायरनंतर 174 किमी x 1437 किमी इतकी कमी झाली असून, चांद्रयान-३ हे चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. यानाचा पुढील ऑपरेशन टप्पा सोमवारी (१४ ऑगस्ट) रात्री 11:30 ते 12:30 वाजता होणार आहे, अशी माहिती देखील इस्रोने दिली आहे.
चांद्रयान-३ ने मंगळवारी १ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. यानंतर शनिवारी ५ ऑस्टला चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश केलेला. यानंतर आज चांद्रयान-३ ने चंद्राच्या दुसरी कक्षा पूर्ण करून तिसऱ्या कक्षेत प्रवेश करत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आजपासून ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान यान चंद्राच्या १०० किमी वर्तुळाकार कक्षेत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे असल्याचे देखील इस्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.