Latest

भारत-म्यानमार सीमेवरही लवकरच कुंपण : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बांगलादेशच्या सीमेप्रमाणे म्यानमारसह भारताची सीमा लवकरच संरक्षित केली जाईल. भारत-बांगलादेश सीमेप्रमाणेच भारत-म्यानमार सीमेवर लवकरच कुंपण घालण्‍यात येईल, अशी घोषणा अमित शहा यांनी आज (दि.२०) केली. या घोषणेमुळे भारत-म्यानमार सीमेजवळील 16 किमी अंतरावर असणार्‍या मुक्‍त संचार क्षेत्रात (एफएमआर) येण्याची परवानगी लवकरच समाप्‍त होणार आहे.

तेजपूरमध्ये सशस्त्र सीमा बल (SSB) च्या 60 व्या स्थापना दिन समारंभात बोलताना अमित शहा म्‍हणाले की, केंद्र सरकारने म्यानमारसह भारताच्या खुल्या सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आम्ही बांगलादेश सीमेवरकुंपण घातले आहे. आता सरकार म्यानमारसोबतच्या असणार्‍या मुक्‍त संचार क्षेत्र करारवरही पुनर्विचार करत आहे. लवकरच भारत येथे कुंपण घालणार आहे.

भारत आणि मान्‍यमार यांच्‍यातील सीमेचे अंतर हे १,६४३ आहे. ही सीमा मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधून जाते. या सर्व राज्यांमध्ये सध्या मुक्‍त संचार क्षेत्रात (एफएमआर आहे. देशाच्‍या ईशान्‍य धोरणांचा भाग म्‍हणून 2018 मध्ये लागू करण्यात आली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT