Latest

मालदिव राष्ट्रपती निवडणूक : ‘सीईसी’ गोयलांकडे निरीक्षक पदाची जबाबदारी

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल हे मालदिवच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये निरीक्षक पदाची जबाबदारी पार पाडणार आहेत. मालदिव निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून आयुक्त गोयल मालदिवमध्ये दाखल झाले आहेत.

मालदिवच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पहिली फेरी ९ सप्टेंबरला झाली. या निवडणूक निरीक्षण कार्यक्रमात अन्य देशांचे आणि संस्थांचे आंतरराष्ट्रीय निरीक्षकही सहभागी झाले होते. पहिल्या फेरीत कोणालाही बहुमत मिळाले नव्हते. आता सर्वाधिक मते मिळवणाऱ्या पहिल्या दोन उमेदवारांमधून राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी ३० सप्टेंबरला मतदान होणार आहे.

मालदीवच्या निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय शिष्टमंडळ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पोहोचले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.११) ही माहिती दिली.

मालदिव राष्ट्रपती निवडणूक भारतासाठी अत्‍यंत महत्त्‍वाची

मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह भारत समर्थक मानले जातात. ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर, त्यांच्या विरोधातील प्रमुख उमेदवार मोहम्मद मुईझ यांचा पक्ष 'पीपल्स नॅशनल काँग्रेस' हा चीन समर्थक मानला जातो. मालदिवशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहे. या देशाचे हिंदी महासागरातील व्यूहतंत्रात्मक स्थान लक्षात घेता चीननेही तेथे वर्चस्व वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक भारतासाठी आणि चीनसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT