Latest

CCTV : ताटातुट झालेले बछडे आईच्या कुशीत, पिल्लांना जबड्यात पकडून मादीचे स्थलांतर

गणेश सोनवणे

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी परिमंडळातील तळवाडे शिवारात येथील बंडू आहेर यांच्या उसाच्या शेतात काही दिवसांपासून एक बिबट्याची मादी आणि तीचे पिल्ले वास्तव्यास होते. मात्र याची ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. मात्र, ज्यावेळी ऊस काढणीला आला, त्यावेळी ऊसतोड कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली. त्यानंतर या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.

ग्रामस्थांनी तत्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिल्याने वनविभागाने उसाच्या शेतात कॅमेरा (CCTV) लावला. मादीला या पिल्लांना घेऊन जाता यावे यासाठी काही काळ ऊस तोडणी थांबवण्यात आली. दरम्यान सायंकाळच्या सुमारास बिबट्याची मादी आपल्या पिलांना घेण्यासाठी आली. या मादीने आपल्या पिल्लांना दुस-या ठिकाणी स्थलांतरित केल्याचे वनविभागाच्या कॅमेरात (CCTV) कैद झाले आहे.

पहा व्हिडिओ :

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT