Latest

जगदीश टायटलर यांच्या विरोधात सीबीआयचे आरोपपत्र

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  कॉंग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. १९८४ मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगलीसंबंधी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. टायटलर यांनी दंगे भडकवले असा ठपका तपास संस्थेने ठेवला आहे.

त्यांनी दिलेल्या चिथावणीमुळेच दिल्लीतील पुल बंगश गुरूद्वाराला संतप्त जमावाने आग लावली. या अग्निकांडात तीन शीखांचा जळून मृत्यू झाला होता. याच प्रकरणात टायटलर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. दंगली प्रकरणात सीबीआयला काही नवीन पुरावे मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.याच पुराव्यांच्या आधारे टायटलर यांच्या विरोधात तपास सुरू करण्यात आल्याचे कळतेय.

काही दिवसांपूर्वी तपास संस्थेकडून टायटलर यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले होते.  ३९ वर्षांपूर्वी टायटलर यांनी त्यांच्या भाषणातून दंगलखोरांना हत्या करण्यासाठी चिथावले होते,असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शीख विरोधी दंग्यांमध्ये त्यांच्या भूमिकेच्या तपासणीकरीता त्यांच्या आवाजाचा नमूना घेण्यात आला आहे. टायटलर यांच्या आवाजाचे नमून्याची तपासणी सीएफसीएल प्रयोगशाळेत केली जात आहे. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांचे शीख सुरक्षारक्षकाने गोळ्याझाडून हत्या केल्यानंतर देशात शीख समाजाविरोधात हिंसाचार उफाळून आला होता. अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचारात शीखांची हत्या करण्यात आली होती.

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT