जयसिंगपूर : जोगेश्वरी यात्रेत भाविकांनी अनुभवला ‘मुकुट खेळ’, जाणून घ्‍या परंपरा

मुकुट खेळ
मुकुट खेळ
Published on
Updated on

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा हालगीचा ठेका आणि कैताळाचा आवाज, तुतारीचा शिंनगार यांच्या संवादात उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेच्या तिसर्‍या दिवशी आज (शनिवार) अकराशे वर्षाची परंपरा असलेला मुकुट खेळ हजारो भाविकांनी अनुभवला. मुकुटाला खिजवून पळत असलेला सवंगडी त्यांच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा थरारक खेळ भाविकांनी आपल्या डोळ्यात टिपला. हा मुकुट खेळ पाहण्यासाठी उदगांवमध्ये हजारो भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.

गेल्या चार दिवसापासून उदगांव येथे जोगेश्वरी यात्रा सुरू आहे. शनिवारी श्री जोगेश्वरी मंदिरातून देवीची मुकूटे सकाळी सहा वाजता बाहेर काढण्यात आली. एक नर, दोन मादीचे मुकुटे व सुपाचा मुकुटाच्या खेळाला सुरूवात झाली. प्रथम जोगेश्वरी मंदिर ते परटाच्या कमानीपर्यंत मुकुट खेळवण्यात आले. यात डोक्यावर मुकुट घेवून हातात वेताची काठी व पाठीमागे धारणारी व्यक्ती असते. यावेळी मुकुटाला खिदवून पळणार्‍या अनेक सवंगड्यांनी मुकुट धारकाच्या हातातील वेताच्या काठीचा मार झेलला. यात अनेक तरूण शालेय मुले, भाविकांनी मुकुट खेळून उत्साह वाढविला. गर्दीतून शिट्ट्या, टाळ्यांचा आवाज शिगेला गेला होता.

त्यानंतर ग्रामपंचायत, गावचावडी, गणपती मंदिर, महादेवी मंदिरापर्यंत खेळ खेळविण्यात आले. त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास मुकुटाकडून नारळ देण्यात आला.

मुकुटासमोर जाऊन तरूणांनी मुकुटाची काठी न खाता नारळ उचलल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर धार्मिक विधी व मानपान झाल्यानंतर मुकुट खेळाची सांगता झाली. या मानपानानंतर मुकुटे श्री जोगेश्वरी मंदिराकडे नेऊन मुकुटांची मंदिरात स्थापना करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलिस ठाण्याकडून कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दरम्यान मुकुट खेळ पाहण्यासाठी उदगाव मध्ये हजारो भाविकांची गर्दी झाली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news