Latest

Career Opportunities : पवनऊर्जेतील करिअर संधी

अनुराधा कोरवी

भारतात पवन ऊर्जेच्या क्षेत्रात येत्या काही वर्षांत प्रचंड गुंतवणूक अपेक्षित आहे. 2027-28 पर्यंत या क्षेत्रात 10 लाखांहून अधिक नोकर्‍या निर्माण होतील, असा विश्वास आहे. त्यामुळे पवनऊर्जेमध्ये करिअर करणे, हा एक सुरक्षित पर्याय आहे. ( Career Opportunities )

संबंधित बातम्या 

आजकाल, ग्लोबल वॉर्मिंगमुळे, जीवाश्म ऊर्जेचे पर्याय जगभर अतिशय वेगाने तयार केले जात आहेत. यापैकी एक पर्याय म्हणजे पवन ऊर्जा. भारतात पवन ऊर्जेचा विकास 1990 च्या दशकात सुरू झाला आणि गेल्या काही वर्षांत त्याला वेग आला. 31 डिसेंबर 2023 पर्यंत भारतात पवन ऊर्जेची एकूण स्थापित क्षमता 44.736 गिगावॅट होती. येत्या काही वर्षांत त्याचा आणखी वेगाने विकास व्हायला हवा; कारण भारतातील पवन ऊर्जा निर्मितीचा खर्च जगातील इतर देशांच्या तुलनेत 40 टक्के कमी आहे. असे मानले जाते की भारतात सुमारे 700 गिगावॅट पवन ऊर्जेची क्षमता आहे. यावरून हे क्षेत्र सुरक्षित करिअरसाठी महत्त्वाचे असल्याचा अंदाज बांधता येतो.

कमी खर्चात प्रदूषण मुक्त ऊर्जा

पवन ऊर्जेमध्ये रोजगारासाठी भक्कम भविष्य आहे. 2035 सालापर्यंत पवनऊर्जा निर्मितीचा खर्च आजच्या तुलनेत 17 ते 35 टक्क्यांनी कमी होईल आणि पवन ऊर्जेचे उत्पादन आजपासून कित्येक टक्क्यांनी वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणून, या ऊर्जेचे भविष्य अक्षय आहे; कारण ही नैसर्गिक संसाधने कधीही कमी होणार नाहीत. पवन ऊर्जा ही प्रदूषणमुक्त आहे, म्हणूनच ती हवामान बदलाशी लढण्यास मदत करते.

गुंतवणूक आणि रोजगाराच्या उत्तम संधी

पवन ऊर्जा हे अशा क्षेत्रांपैकी एक आहे जेथे एकदा गुंतवणूक केली की, आणखी गुंतवणुकीची गरज नसते, फक्त देखभाल खर्च शिल्लक राहतो. भारतात पवन ऊर्जेच्या क्षेत्रात येत्या काही वर्षांत प्रचंड गुंतवणूक अपेक्षित आहे. 2027-28 पर्यंत या क्षेत्रात 10 लाखांहून अधिक नोकर्‍या निर्माण होतील, असा विश्वास आहे. त्यामुळे पवनऊर्जेमध्ये करिअर करणे हा एक सुरक्षित पर्याय आहे.

विंड टर्बाईन तंत्रज्ञ

पवन ऊर्जेच्या क्षेत्रात सर्वात योग्य स्थान हे विंड टर्बाईन तंत्रज्ञ आहे. यासाठी देशात अनेक ठिकाणी शिल्पकार प्रशिक्षण योजना (उढड) किंवा शिकाऊ प्रशिक्षण योजना अंतर्गत अभ्यासक्रम चालवले जातात. विंड प्लांट टेक्निशियन हा आयटीआयचा प्रमुख विषय आहे आणि हा विषय देशभरात पसरलेल्या सुमारे 4000 आयटीआयमध्ये शिकवला जातो, त्याद्वारे डिप्लोमा घेऊन या क्षेत्रात नोकरी मिळवता येते. परंतु जर तुम्हाला मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, रिन्युएबल एनर्जी आदी कोणत्याही औद्योगिक क्षेत्रातील तांत्रिक पार्श्वभूमी असेल तर टर्बाईन टेक्निशियनचा सर्टिफिकेट कोर्स करून तुम्ही या क्षेत्रात नोकरी मिळवू शकता.

तांत्रिक कौशल्येही महत्त्वाची आहेत

पवन ऊर्जा अभियंता होण्यासाठी, आपल्याकडे तांत्रिक कौशल्ये देखील आवश्यक आहेत. अभियंते डिझाईन, ऑपरेट आणि चाचणी करण्यासाठी संगणक आणि विविध कार्यक्रमांचा वापर करतात. हे लोक प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी एमएस ऑफिस आणि बजेट सॉफ्टवेअर देखील वापरतात. पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या दोन वर्षांचा डिप्लोमा असलेल्या आयटीआय प्रशिक्षणार्थींना प्राधान्य देतात; तर पाच वर्षांचा अनुभव असलेल्या पवन ऊर्जा अभियंत्यांना प्राधान्य दिले जाते.

कामाचे स्वरूप

पवन ऊर्जा क्षेत्रात अनेक प्रकारचे काम आणि नोकर्‍या आहेत. जसे की पवन ऊर्जा विश्लेषक हे ठरवू शकतात की एखाद्या विशिष्ट ठिकाणी पवनचक्की बसवणे व्यावहारिक आहे की नाही. त्याच वेळी, अशा लोकांना या क्षेत्रात नोकर्‍या देखील मिळतात जे देशाच्या विविध भौगोलिक भागात फिरतात आणि वार्‍याचा प्रवाह कुठे जास्त आणि उत्पादक आहे हे शोधतात. तसेच, पवनऊर्जा फॉर्म डिझाईन आणि लेआउट बनविणार्‍या तज्ज्ञांना देखील प्राधान्य मिळते. सहाय्यकांनाही नोकर्‍या मिळतात. विंड टर्बाईन टेक्निशियनचे सुरुवातीचे वेतन 20 ते 25 हजार रुपये प्रति महिना आहे. यानंतर अनुभव, कौशल्य आणि मेहनत यानुसार पगार दिला जातो. पाच वर्षांच्या अनुभवानंतर पवन टर्बाईन इंजिनिअरला 70 हजार ते 1 लाख रुपये मासिक वेतन मिळणे अवघड नाही. ( Career Opportunities )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT