Latest

Cardi B : लाईव्ह शोमध्ये कार्डी बीवर फेकली दारू; संतापलेल्या गायिकेने काय केलं पहा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन प्रसिद्ध गायका आणि रॅपर कार्डी बी (Cardi B) तिच्या गाण्याने नेहमीच चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते. तिचे लाईव्ह सेक्सन पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झालेली असते. दरम्यान कार्डी बीच्या गाण्याचा लाईव्ह परफार्मन्स सुरू असताना एका चाहत्याने गैर वर्तणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.

अमेरिकेतील लॉस एन्जेल्स शहरात काल कार्डी बीचं (Cardi B) चं लाईव्ह सेक्शन गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता. या कार्यक्रामाला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान कार्डी बी गाणे म्हणत असताना मध्येच एका चाहत्यांने तिच्या चेहऱ्यावर दारू फेकली. या घटनेनंतर कार्डी बी संतापली आणि तिचे गाणे थांबवत रागाच्या भरात हातातील माईक चाहत्याच्या दिशेने जोरात फेकला.
यानंतर कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या ही बाब लक्षात आली. यानंतर त्यांनी ताबोडतोब त्या चाहत्याला तेथून हकलून दिले. कार्डी बीसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्राम खूपच व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तर काही युजर्सनी तिचे भरभरून कौतुक करताना कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. 'तिने योग्यच केलं'. 'अशी दारू कोणी कसं काय फेकू शकतं?', 'तिच्याशी सहमत आहे'. 'काही लोक खूप चुकीचे वागतात', 'खंबीर महिला असल्याची ही लक्षणं आहेत', 'कलाकारांचा अपमान करणं चुकीचं आहे'. यासारख्या अनेक कॉमेन्ट केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यत १ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

SCROLL FOR NEXT