Latest

राधानगरी विधानसभा मतदारसंघात मंत्री पदाचे वारे! ‘यांना’ मिळणार मंत्रीपद?

अमृता चौगुले

मुदाळतिट्टा, शाम पाटील : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मे महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. गेले दोन वेळा आमदार झालेल्या प्रकाश आबिटकर यांना यावेळी मंत्रिपद बहाल करून लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पूर्ण होणार काय याबाब चर्चा होताना दिसत आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारची सत्ता येऊन बरेच महिने झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेने मधुन निवडून आलेली एकमेव आमदार प्रकाश आबिटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहिले. पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आमदार आबिटकर यांना स्थान मिळेल व कोल्हापूरला त्यांच्या रूपाने मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसेच झाले नाही.

सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू आहेत भाजपाकडून व शिवसेनेकडून कोण मंत्री होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सोशल मीडियावर राज्यातील अनेक नेत्यांची नावे प्रामुख्याने मंत्रिपदाचे यादीमध्ये दिसत आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नावे आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला दोन्ही पक्षाकडून मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश आबीटकर यांचे नाव आघाडीवर आहे. जर आबिटकर यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले तर राधानगरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच लाल दिव्याची गाडी जनतेला पहावयास मिळेल. कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्ती होईल.आमदार प्रकाश आबीटकर मंत्री होणार याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडिया वरून होताना दिसून येत आहे. आमदार ,नामदार व्हावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

खासदार संजय मंडलिक हे आमदार प्रकाश आबीटकर यांना मंत्रीपद मिळावे यासाठी जोरात हालचाली करतील व त्यांच्या मंत्रिपदाबाबत आपला हक्क सांगतील असेही बोलले जात आहे. दरम्यान राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रिपद मिळेल अशी शक्यता निर्माण झाली.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT